ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरे शांत झाले का? ‘या’ सभेत मिळणार उत्तर

गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एकही सभा झालेली नाही. सर्व पक्ष निवडणुकीची तयारी करत असताना राज ठाकरे ईडीची नोटीस आल्यानंतर शांत झाले का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आता या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. कारण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात सभेसाठी मैदान मिळालं आहे.

राज येत्या बुधवारी (९ ऑक्टोबर) ला पुण्यातील सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहेत. १ ऑक्टोबर ला मनसेनं जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. मात्र, या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता या सभेला प्रशासनानं परवानगी दिल्यानं राज यांची पुण्यात पहिली प्रचारसभा होणार आहे.