#Lockdonw : नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेतर्फे आणखी एक मोठी घोषणा

Courtesy: Social Media

कोरोनाच्या संकटामुळे देशभरात गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे कोट्यवधी स्थलांतरीत मजूर आणि इतर नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. या सगळ्यांच्या सोयीसाठी सरकारतर्फे रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लाखो मजूर आतापर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. तर दुसरीकडे इतर नागरिकांना जाता यावे यासाठी वेगळ्या ट्रेनही सोडण्यात येत आहे.

आता रेल्वेतर्फे नागरिकांसाठी आणखी एक सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 1 जूनपासून 200 नॉन एसी ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. या गाड्यांसाठीचे आरक्षण आणि इतर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून 1600 गाड्यांमधून आतापर्यंत 21 लाख 50 हजार मजूरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले असल्याची माहिती रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.