Home > News Update > औरंगाबाद मजूर दुर्घटना प्रकरणी चौकशीला सुरूवात

औरंगाबाद मजूर दुर्घटना प्रकरणी चौकशीला सुरूवात

औरंगाबाद मजूर दुर्घटना प्रकरणी चौकशीला सुरूवात
X

औरंगाबादमध्ये १६ मजूर मालगाडी खाली चिरडले गेल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत. यानंतर रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त राम क्रिपाल हे या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद आणि जालना दरम्यान रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर मालगाडीखाली चिरडले गेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.

हे सर्व मजूर मध्य प्रदेशमधले होते. लॉकडाऊनमुळे सर्व मजूर आपापल्या घरी निघाले होते. जालन्याहून गुरुवारी संध्याकाळी सात वाजता या सर्वांनी चालण्यास सुरूवात केली. बदनापूरमार्गे ते रस्त्याने चालत निघाले. पण त्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरुन चालण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा...


Aurangabad Train Accident: कामगारांनो घरी परतण्यासाठी जीवावर उदार होऊ नका- मुख्यमंत्री

धक्कादायक! औरंगाबादेत एसआरपीएफच्या ७२ जवानांना कोरोनाची लागण

Maharashtra MLC Polls: मोदींना शिव्या घालणाऱ्यांना संधी: एकनाथ खडसे

ऑनलाईन मद्यविक्रीबाबत सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना विचारणा

पण ३६ किलोमीटरपर्यंत चालल्यानंतर सर्वजण थकले होते. त्यामुळे त्यांनी रेल्वे ट्रॅकवरच आराम करण्याचा निर्णय घेतला. पण यातील काही जणांना ट्रॅकवरच झोप लागली आणि ही दुर्घटना घडली, अशी माहिती या दुर्घटनेमधून वाचलेल्या काही मजुरांनी दिल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

Updated : 8 May 2020 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top