माझे सरकारशी मतभेद आहेत पण… कश्मीर प्रश्नावर काय बोलले राहुल गांधी

माझे सरकारशी अनेक विषयांवर मतभेद आहेत, पण मला स्पष्टपणे सांगायचंय की कश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तान किंवा इतर कुठल्याही देशाला यात बोलायचा काहीच अधिकार नाही. कश्मीरमध्ये हिंसेच्या घटना घडतायत. ही हिंसा घडतेय कारण पाकिस्तान आगीत तेल ओतण्याचं काम करतंय, आणि चिथावणी देतंय. पाकिस्तानच्या समर्थनामुळेच या हिंसा होतायत, जगभरात पाकिस्तान हा दहशतवादी देश म्हणून ओळखला जाातोय. असं राहुल गांधी यांनी आज ट्वीट करून आपली जम्मू कश्मिर मधल्या हिंसेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
राहुल गांधी यांच्या कश्मिर दौऱ्याबाबत टीका करताना भाजपाने काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचं म्हटलं होतं. राहुल गांधी यांना श्रीनगर विमानतळावरून परत पाठवण्यात आलं होतं.