Home > News Update > VIDEO : राधाकृष्ण विखे पाटलांची लवकरच घरवापसी - हसन मुश्रीफ

VIDEO : राधाकृष्ण विखे पाटलांची लवकरच घरवापसी - हसन मुश्रीफ

VIDEO : राधाकृष्ण विखे पाटलांची लवकरच घरवापसी - हसन मुश्रीफ
X

लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखेपाटील पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये येणार असल्याचे संकेत ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीम यांनी दिले आहे. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांनी जेव्हा या संदर्भात वक्तव्य केलं तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित होते.

विखे पाटील महाविकास आघाडीत परत येतील. ते काँग्रेस विचारांचे आहेत. विखे पाटील नाईलाजाने तिकडे गेले आहेत, असा दावा हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विभागनिहाय आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

Updated : 21 Feb 2020 2:57 PM GMT
Next Story
Share it
Top