राधाकृष्ण विखे- पाटीलांना मंत्रीपद, भाजपात बंडाळी? 

5

मुंबई : फडणवीस सरकारच्या  राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना स्थान मिळणार असल्याने भाजपातील नाराजांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली  आहेत. राधाकृष्ण विखे- पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे- पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाची वाट धरली होती.

राधाकृष्ण विखे- पाटील यांनीही लोकसभा निव्वडणुकीत पक्षनिष्ठा बाजूला ठेऊन  चिरंजीव सुजय यांच्या प्रचारावर भर दिला होता. आता अवघ्या काही दिवसांपूर्वी भाजपात आलेल्या  राधाकृष्ण विखे- पाटील यांना मंत्रीमंडळात  स्थान मिळाल्याने येत्या काळात बंडोबा आणि नाराजांना थोपवण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असणार आहे.

Comments