Home > News Update > NRC’ आणि ‘CAB’ विरोधात पुणे विद्यापीठात मशाल मोर्चा

NRC’ आणि ‘CAB’ विरोधात पुणे विद्यापीठात मशाल मोर्चा

NRC’ आणि ‘CAB’ विरोधात पुणे विद्यापीठात मशाल मोर्चा
X

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एनआरसी आणि नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात समविचारी संघटनांनी एकत्र येत मशाल मोर्चा काढला. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे, युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्यासह हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेत ‘NRC’ आणि ‘CAB’ ला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली.

दिल्लीत जामीया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दिला. मी एक नागरीक म्हणून इथे आली आहे. मी माझं मत संसदेत मांडलं असून सरकारने संविधान विरोधी निर्णय घेतला असल्याने तुम्हाला रस्त्यावर उतरायला लावणे हे सरकारचं अपयश आहे. असं मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात समता व माणूसकी कायम टिकून राहणार. त्याचप्रमाणे शांततेत आंदोलन करा, असा सल्लाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचा वणवा पेटला असून या आंदोलनात युवा वर्ग आणि विद्यार्थी अग्रस्थानी दिसत आहेत. No ‘CAB’ NO ‘NRC’ असा हॅशटॅग घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काढण्यात आलेल्या मशाल मोर्चात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या आवारातील अनिकेत कँटीन ते विद्यापीठ आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.

Updated : 19 Dec 2019 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top