Home > News Update > ‘भारत माता की जय’ म्हणावंच लागेल- केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान  

‘भारत माता की जय’ म्हणावंच लागेल- केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान  

‘भारत माता की जय’ म्हणावंच लागेल- केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान  
X

देशात सध्या एनआरसी (NRC), सीसीए (CAA) आणि लोकसंख्या सूची वरून रणकंदन माजलंय. त्यातच आता देश धर्मशाळा बनतोय जो येईल तो राहील असं चालणार नाही. भारतामध्ये ‘भारत माता की जय’ हे म्हणावंच लागेल आणि असं म्हणणारेच देशात राहू शकतील. असा इशारा केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलाय.

पुण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी एनआरसी, सीएए आणि लोकसंख्या सूची वरून विरोधकांना खडेबोल सुनावले. देशाचे तुकडे करण्याची योजना असलेल्यांचे अनुयायी आजही तोच विचार करत असल्याचा आरोप यावेळी प्रधान यांनी केलाय.

“चीन मध्ये सरकारच्या विरोधात कोण घोषणाबाजी करु शकतो का? देशात लोकशाही असून मतभिन्नता असू शकते, वाद-विवाद होऊ शकतो. मात्र, देशात सध्या नागरिकत्व कायदा लोकसंख्या सूची व्हावी की नाही यावरती वाद-विवाद होतोय. जगात असा कोणता देश आहे. जिथे राहणाऱ्या नागरिकांचा हिशोब ठेवला जात नाही” असा सवाल प्रधान यांनी केला आहे.

Updated : 29 Dec 2019 8:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top