CAA च्या विरोधात सर्वधर्मिय एकवटले; आझाद मैदानात उपेक्षित समुहांचा सत्याग्रह

21

नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 व त्या अनुषंगाने लादली जातं असलेली NRC व NPR प्रक्रिया याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. देशातल्या वेगवेगळ्या भागात आपापल्या परीने लोक एकत्र येऊन या प्रक्रीयेविरोधात आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर आदिवासी, मागासवर्गीय, भटके विमुक्त, वर्ग आणि सर्व उपेक्षित समाजकडून आंदोलन करण्यात आलं.

CAA हा कायदा आणि NRC व NPR प्रक्रिया संविधान विरोधी असून त्याविरोधात महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात ठराव संमत करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेकडो लोकांचा सहभाग होता. विशेष म्हणजे यात महिलांचा उपस्थिती लक्षणीय होती.

NRC, NPR प्रक्रिया ही या सर्व समाज घटकांच्या मानवी कायद्याचे उलंघन करणारी आहे, या प्रक्रियेमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकणाऱ्या देशातील या बहुसंख्य देशवासियांना आपले नागरिकत्व सिद्ध करणे अशक्य आहे ठरणार आहे. ज्यांचा संसार रस्त्यावर आहे, अश्या लोकांना भारताचं नागरिकत्व सिद्ध करता येणार नाही अशी प्रतिक्रिया ज्योती बडेकर यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

Comments