Home > News Update > मुंबईतील शेतकरी मोर्चा संबंधित, आंदोलकांवर केसेसचा 'आप' कडून निषेध

मुंबईतील शेतकरी मोर्चा संबंधित, आंदोलकांवर केसेसचा 'आप' कडून निषेध

मुंबईतील शेतकरी मोर्चा संबंधित, आंदोलकांवर केसेसचा आप कडून निषेध
X

प्रशासनाद्वारे मुंबईतील शेतकरी मोर्चा संबंधित 'आप' सचिव धनंजय शिंदे व इतर आंदोलकांवर दाखल केसेसचा 'आप' कडून निषेध

मुंबई पोलिसांकडून 'आप' सचिव धनंजय शिंदे, प्रतिभा शिंदे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी असल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम आदमी पक्ष या कृत्याचा निषेध नोंदवते.

मुंबईतील मोर्चामध्ये तब्बल 10,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेत स्वाभिनाथन आयोग शिफारशींची अंमलबजावणी, कर्जमाफी व आदिवासीयांच्या जंगल जमीन हक्कांविषयी आवाज उठवला होता.

एक वर्ष उलटून देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही लेखी अश्वासनांची पूर्तता न करता त्यांना केराची टोपली दाखवली. निवडणुका पार पडल्यानंतर मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. शेतकरी आंदोलनाची व त्यात सामील नेतृत्वाची गळचेपी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या गळचेपीला आंदोलक घाबरणार नसून आम आदमी पक्ष सर्व आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

Updated : 1 Nov 2019 5:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top