कोरोना व्हायरस च्या विरोधात 20 लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर पॅकेज: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कोरोना व्हायरस च्या विरोधात लढण्यासाठी 20 लाख कोटी रुपयाचे पॅकेज घोषीत केले आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपी च्या 10 टक्के असेल असा दावा मोदी यांनी केला आहे. रिझर्व्ह बँकेनं आधी जाहीर केलेलं पॅकेज आणि आजचं पॅकेज जोडलं तर 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज होईल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

या पॅकेजच्या लॅंड, लेबर, लॉ, लिक्विडीटी वर लक्ष दिलं आहे. या पॅकेज संदर्भात उद्यापासून पुढचे काही दिवस अर्थमंत्री या आर्थिक पॅकेजची माहिती देशाला देतील.

या पॅकेजमध्ये शेती क्षेत्राला असे आमूलाग्र पद्धतींनं बदलून टाकू ज्यामुळे भविष्यात कोरोनासारख्या संकटाचा शेती क्षेत्रावर कुठला परिणाम होणार नाही. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.