Home > News Update > उदयनराजेंवर जहरी टीका, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने नवा वाद

उदयनराजेंवर जहरी टीका, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने नवा वाद

उदयनराजेंवर जहरी टीका, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने नवा वाद
X

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर क्रांती मोर्चाने जाहीर केलेल्या बंदला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आहे. पण यावेळी प्रकश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसंच संभाजीराजे हे मराठा आऱक्षणाच्या प्रश्नापेक्षा इतर मुद्दयांकडे लक्ष देत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामंजस्य बिघडू नये म्हणून आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. पण कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करू नका, अशी विनंती आपण मोर्चाचे आयोजक सुरेश पाटील यांना केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Updated : 8 Oct 2020 12:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top