Home > News Update > पोलीसांच्या वसाहतीत कोब्राच्या दंशाने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पोलीसांच्या वसाहतीत कोब्राच्या दंशाने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पोलीसांच्या वसाहतीत कोब्राच्या दंशाने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
X

कधी बॉम्ब स्फोट, तर कधी महापूर या सारख्या मोठ्या संकटातून स्वत:चा जीव धोक्यात घालून मुंबई करांना वाचवणारे मुंबई पोलिस. मात्र, हे मुंबई पोलिसांचे कुटूंब सुरक्षित आहे का? मुंबईच्या पोलिस वसाहतीत कसे निघतात कोब्रा साप? पाहा कोब्रा सापा ने दंशाने पोलिसाचा मृत्यू

राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुंबई पोलिसांचीच कुटूंब सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील कुर्ला- नेहरु नगर या भागात पोलिसांची शासकीय वसाहत आहे. या वसाहतीमध्ये कोब्राचे वास्तव समोरं आलं आहे.

शासकीय पोलीस वसाहतीत पोलीस हवालदार सुनील भगत वय वर्ष 32 हे आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. सुनील भगत हे वरळी पोलीस स्टेशन मध्ये तर त्यांची पत्नी समृद्धी जाधव या देवनार पोलीस ठाण्यात पोलीस सेवेत कार्यरत आहेत. परंतू मध्यरात्री सुनील जाधव यांच्या पायाला साप चावल्यानं अचानक त्यांना वेदना आणि त्रास होऊ लागला.

याची माहिती त्यांनी त्यांची पत्नी समृद्धी भगत यांना दिली, परंतु पायाला त्रास होणे, वेदना होणे हे किरकोळ स्वरूपातील त्रास असू शकतो असं समजून समृद्धी जाधव यांनी दुर्लक्ष केलं. पण अचानकपणे सुनील भगत यांच्या तोंडातून फेस निघाल्यामुळे समृद्धी जाधव या भयभीत झाल्या.

त्यांनी लगेच किचन मध्ये जाऊन पाणी आणण्यासाठी लाईट लावली तर त्यांच्या नजरे समोर साप दिसला, समृद्धी जाधव यांनी तात्काळ शेजाऱ्यांची मदत घेऊन त्यांनी नेहरु नगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. त्यानंतर सुनील भगत सायन हास्पिटल मध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु त्यांच्यावर उपचार होण्यापूर्वीच सुनील भगत यांचा मृत्यू झाला होता. अशी माहिती पोलीस वसाहतील सुनील भगत यांच्या शेजारी यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

हे ही वाचा

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

गांधीजी आम्हाला माफ करा – हेमंत देसाई

अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी

जे पोलिस मुंबईच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटत असतात. त्यांच्या वसाहतीमध्ये अशा प्रकारे साप आला कुठून असा प्रश्न पडणं सर्वसामान्य नागरिकांना पडणं साहजिकच आहे. मात्र, जे पोलिस आपलं संरक्षण करतात. ते कसे राहतात? हे जर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर याची उत्तर मिळतात.

पोलिस वसाहतीच्या बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आहे. तसंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बीळ पाहायला मिळाली आहे. या बिळात नेहमी उंदीर निघतात. तसंच दोन वेळा या ठिकाणी साप निघाल्याची माहिती स्थानिक कुटूंबियांनी दिली. याबद्दल आम्ही तेथील स्थानिक नागरिकांना विचारले, त्यांनी आधीच नेहरु नगर पोलीस स्टेशन मध्ये अस्वच्छ परिसर असल्याची माहिती दिली होती, पोलीस प्रशासनाने योग्य वेळी काळजी घेतली असती तर आज सुनील भगत यांचे प्राण वाचले असते.... असं मत पोलिस वसाहतीतील नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

त्यामुळं राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुंबई पोलिसांचीच कुटूंब सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे

Updated : 11 Dec 2019 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top