लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत, निर्बंध कमी होणार

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर चौथ्या लॉकडाऊनचा सरकारचा विचार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. सोमवारी पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

या चर्चे दरम्यान पंतप्रधानांनी लॉकडाऊन चौथ्या टप्प्यातही असेल असे संकेत दिले. कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि लोकांना सार्वजनिक व्यवहार करता येणे हे प्रमुख उद्देश असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. “लॉकडाऊनचा पहिल्या टप्पा सुरू केला तेव्हा कडक निर्बंध होते, पण दुसऱ्या टप्प्यात एवढ्या कडक निर्बंधांची गरज नव्हती. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांची चौथ्या टप्प्यात गरज नसेल,” असे म्हणत मोदी यांनी १७ मे नंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा असेल असे स्पष्ट संकेत दिले.

हे ही वाचा…उद्धव ठाकरे परप्रांतीयांसाठी ट्रेन सोडा, असं सांगत असताना देवेंद्र फडणवीस कुठं होते?

खडसे कोणत्या पक्षात जाणार? निर्णय लॉकडाऊन नंतर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नोकरदार, पाहा किती आहे संपत्ती?

हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपालांची भेट

कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पाचव्यांदा संवाद साधला. भारतात कोरोनाचा भौगोलिक पातळीवर प्रादुर्भाव कसा होतो हे आता कळले असल्याने जिल्हा पातळीपर्यंतच्या अधिकाऱ्यांना यावर काम कसे करायचे ते आता समजले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. त्याचबरोबर लॉकडाऊन हळूहळू कसे उठवावे, सार्वजनिक व्यवहार सुरू करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात याचे प्रस्ताव १५ पर्यंत देण्याची सूचना मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली.