Home > News Update > डकार में झूठ ही निकलेगा ...कोण म्हणालं मोदींना असं थेट ?

डकार में झूठ ही निकलेगा ...कोण म्हणालं मोदींना असं थेट ?

डकार में झूठ ही निकलेगा ...कोण म्हणालं मोदींना असं थेट ?
X

निवडणुका असल्या की प्रधानमंत्री मोदी गुजरातेत थेपला खातात, बंगालमध्ये रोसोगुल्ला खातात आणि बिहारमध्ये लिट्टी चोखा खातात...पण मोदीजी, आपण काहीही खाल्लं तरी ढेकर असत्याचीच येणार ! गटार में तो 'झूठ' ही निकलेगा !!! हे ट्वीट केलंय गुजरातमधील युवा नेता आमदार जिग्नेश मेवानी यांनी.

https://twitter.com/jigneshmevani80/status/1230129942962278401?s=19

काल दिल्लीत राजपथावर सुरू असलेल्या हुनार हाट ला मोदींनी अचानक भेट दिली. तब्बल पन्नास मिनिटे ते तिथे वावरले. कलाकृतींनाही त्यांनी भेट दिली. मोदींनी तिथे बिहारमधील प्रसिध्द खाद्यपदार्थ लिट्टी चोखाचा आस्वाद घेतला आणि कुल्हडमधून चहाही घेतला. मोदींनी ट्वीटरवर त्याचे फोटो शेअर केले आणि देशाला चर्चेला नवा विषय दिला.

https://twitter.com/narendramodi/status/1230077171953070080?s=19

राजद नेता तेज प्रताप सिंग यांनी म्हटलंय, कतनो खईबऽ लिट्टी चोखा, बिहार ना भुली राउर धोखा..!

https://twitter.com/TejYadav14/status/1230142837976698882?s=19

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कनोजिया यांनी लिहिलंय की अभी लिट्टी चोखा खा रहे हैं, फिर माछ भात खाएंगे, फिर "खार" खाएंगे, फिर इडली सांभर खाएंगे, क्रोनोलॉजी समझ लीजिए !!

पत्रकार पुण्य प्रसून वाजपेयी लिहितात, राजकीय सत्य !!! गृहमंत्र्यांनी दिल्लीतील आतंकवादीची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी दिल्लीस्थित पाकिस्तानात पोचले. नागरिकत्वाच्या मुद्दयावर जेव्हा सगळ्यांचं लक्ष शाहीन बागवर होतं, तेव्हा प्रधानमंत्री लिट्टीचोखा खाऊन सर्वांना चकीत करीत होते.

विरोधकांना मोदींचं लिट्टीचोखा निवडणूक स्टंट वाटतोय, पण मोदी एका स्वादिष्ट भारतीय खाद्यपदार्थाला जगप्रसिद्धी देत असल्याबद्दल अनेकांनी मोदींचं कौतुकही केलंय. बिहारचे माजी खासदार हरि मांझी, रामविलास पासवान यांचा त्यात समावेश आहे.

https://twitter.com/HariManjhi/status/1230080578440941569?s=19

Updated : 20 Feb 2020 5:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top