Home > News Update > CAAविरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींचा आसाम दौरा पुन्हा रद्द

CAAविरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींचा आसाम दौरा पुन्हा रद्द

CAAविरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींचा आसाम दौरा पुन्हा रद्द
X

CAA कायद्या विरोधातील तीव्र आंदोलनामुळे महिनाभरात दोनवेळा आसाम दौरा रद्द करण्याची नामुष्की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओढवली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAAच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. पण आसाममध्ये या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. गुवाहाटीमध्ये तिसऱ्या खेलो इंडिया या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी येणार होते.

पण CAA विरोधात लढत असलेल्या ऑल आसाम स्टुडंट युनियन आणि इतर संघटनांनी पंतप्रधान मोदी उद्घाटनाला आल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. पण पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

याआधीही CAA विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे जपानचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी यांची गुवाहाटीमधील बैठक रद्द करण्यात आली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला बोलावण्याचा प्रयत्न असल्याचं आसाम सरकारकडून सांगण्यात येतंय.

नागरिकत्व सुधारणा विधेयक जेव्हा संसदेत मांडण्यात आले तेव्हापासूनच आसाममध्ये याविरोधात संतप्त आंदोलनं सुरू झाली होती. त्यानंतर हे विधेयक मंजूर झाले आणि आसाममध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा भारत दौरा त्यांनी रद्द केला. गुवाहाटीमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान यांची भेट होणार होती.

Updated : 9 Jan 2020 5:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top