पार्थ पवार अपरिपक्व – शरद पवार

103

अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेले पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत आणि त्यांच्या बोलण्याला आपण किंमत देत नाही, अशी प्रतिक्रिया आजोबा शऱद पवार यांनी दिली आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा मतभेद निर्माण झाले आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांची बैठक झाल्यानंतर शरद पवार यांना पार्थ पवार यांनी सुशांत सिंहप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, यावर प्रश्न विचारला असता, पार्थ पवार अपरिपक्व आहे आणि त्यांच्या सीबीआयच्या चौकशीच्या मागणीला आपण किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करुन आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत आणले आहे. तर दुसरीकडे राम मंदिराचे भूमिपूजन कोरोनाच्या संकटाच्या काळात करु नये अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली असताना पार्थ पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी जय श्रीरामचा नारा देत भूमिपूजनाचे समर्थन केले होते. पार्थ पवार यांनी या पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळ्या भूमिका जाहीरपणे मांडल्यानं पक्षांतर्गत मतभेद समोर आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Comments