Home > News Update > "सुशांत सिंहची आत्महत्या नव्हे हत्या", नातेवाईकांचा गंभीर आरोप

"सुशांत सिंहची आत्महत्या नव्हे हत्या", नातेवाईकांचा गंभीर आरोप

सुशांत सिंहची आत्महत्या नव्हे हत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप
X

अभिनेता सुशांत सिंह याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे, असा आरोप सुशांत सिंहच्या मामांनी केला आहे. तसंच पोलिसांनी याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान सुशांत सिंहने आत्महत्या केलेली नाही तर यामागे मोठा कट असल्याचा आरोप बिहारमधील जनअधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी केला आहे. तसंच सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हे ही वाचा..

आभासी जगण्यात वास्तवातले गुंते – विजय चोरमारे

आत्महत्या का?

#Breaking – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

"सुशांत सि़ंंहचे कामावर प्रेम होते आणि तो सतत कामात असायचा, तो आत्महत्या करणे शक्य नाही, त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणी CBI चौकशी करावी "अशी मागणी पप्पू यादव यांनी केली आहे. सुशांत सिंहची हत्या झाल्याची शक्यता असू शकते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

सुशांत सिंहने रविवारी आपल्या वांद्रे इथल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण त्याच्या घरात कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याने पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Updated : 15 Jun 2020 4:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top