Home > News Update > Palghar Mob Lynching: प्रकरणी मोठी कारवाई, 35 पोलिसांची तडकाफडकी बदली...

Palghar Mob Lynching: प्रकरणी मोठी कारवाई, 35 पोलिसांची तडकाफडकी बदली...

Palghar Mob Lynching: प्रकरणी मोठी कारवाई, 35 पोलिसांची तडकाफडकी बदली...
X

पालघरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या तीन जणांच्या मॉब लिंचिंगप्रकरणी कारवाईला सुरूवात झाली आहे. कासा पोलीस स्टेशनमधील ३५ पोलिसांची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे देण्यात यावा अशी मागणी करणारी एक याचिक मुंबई हायकोर्टात दाखल कऱण्यात आली आहे.

मुंबईतील एक वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११० जणांना ताब्यात घेतले आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात रात्रीच्या वेळी कारमधून जाणाऱ्या तीन जणांना चोर समजून इथल्या गावकऱ्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत या तिन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

Updated : 29 April 2020 2:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top