Covid 19: राज्यात एका दिवसात 440 रुग्णांची नोंद, रुग्णांची संख्या 8068 वर

आज राज्यात कोरानाचे ११२  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ११८८  करोना बाधीत रुग्णांवर यशस्वी इलाज झाला आहे. आज दिवसभरात घेण्यात आलेल्या टेस्ट मध्ये ४४० नवीन रुग्णाच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या..

मृत्यू:

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या…

आज राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८०६८ वर पोहोचली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, जळगाव येथे २, सोलापूर शहरात १, तर लातूर येथे १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

 राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे

अ.नं. जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्णण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ५४०७ २०४
ठाणे ७३८ १४
पालघर १४१
रायगड ५७
मुंबई मंडळ एकू ण ६३४३ २२३
नाशिक १३१ १२
अहमदनगर ३६
धुळे २५
जळगाव १९
नंदुरूबार ११

 

नाशिक मंडळ एकूण २२२ २२
१० पुणे १०५२ ७६
११ सोलापूर ४७
१२ सातारा २९
पुणे मंडळ एकूण ११२८ ८३
१३ कोल्हापूर १०
१४ सांगली २७
१५ सिंधुदूर्ग
१६ रत्नागिरी
कोल्हापूर मंडळ एकूण ४६
१७ औरंगाबाद ५०
१८ जालना
१९ हिंगोली
२० परभणी
औरंगाबाद मंडळ एकूण ६१
२१ लातूर
२२ उस्मानाबाद
२३ बीड
२४ नांदेंड
लातूर मंडळ एकूण १४
२५ अकोला २९
२६ अमरावती २०
२७ यवतमाळ ४८
२८ बलु ढाणा २१
२९ वाशिम
अकोला मंडळ एकूण ११९
३० नागपूर १०७
३१ वर्धा
३२ भंडारा
३३ गोंदिया
३४ चंद्रपूर
३५ गडिचिरोली
नागपूर एकूण ११०
इतर राज्ये २५
  एकूण ८०६८ ३४२

 

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८६०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३३.७२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.