Home > News Update > तरुणाला मारहाण : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची तातडीने चौकशी करा

तरुणाला मारहाण : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची तातडीने चौकशी करा

तरुणाला मारहाण :  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची तातडीने चौकशी करा
X

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणी प्रविण दरेकर यांनी ठाणे शहराचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे संर्पक साधून संबंधितांविरुध्द तातडीने व निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.

या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाची दखल घेत विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी पोलिस आयुक्त फणसाळकर यांच्याशी संपर्क साधून गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्याविरुध्द कठोर कारवाईची मागणी केली. याप्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला तरी त्याच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी केली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु असुन यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त फणसाळकर यांनी दरेकर यांना दिले आहे. त्यामुळं आता आव्हाड यांच्यावर काय कारवाई होते. हे पाहणं महत्वाचं आहे.

Updated : 7 April 2020 3:15 PM GMT
Next Story
Share it
Top