“सुशांत सिंह प्रकरणी सत्य बाहेर येऊ न देण्यासाठी प्रयत्न, रहस्य उलगडणार”

36

अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या मृत्यूचा तपास योग्य मार्गाने होऊन सत्य बाहेर येऊ नये यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर जे प्रकार सुरू आहेत त्याची पटकथा कुणीतरी लिहित तसून त्याप्रमाणे घडवले जात आहे असा आऱोपही संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईतील गुन्ह्याची एफआयआर ४० दिवसांनी पाटण्यात दाखल होते, मग त्यांच्या नातलगांना धक्का बसतो, बिहारचे मुंक्यमंत्री त्यात पडतात. बिहारच्या विधानसभेत CBI चौकशीचा ठराव पास होतो, सीबीआयकडे प्रकरण देण्याचा तगादा लावला जातो, आणि मग हा तपास सीबीआयकडे देण्यासाठी आदेश काढला जातो.

हे सगळं ठरवून केलं जात आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येऊ नये यासाठी कुणीतरी पडद्यामागे काय हालचाली करतं आहे याची माहिती आमच्या हाती आली आहे आणि योग्यवेळी ते नाव कळेल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

Comments