एक गाव पुरातलं… मौजे डिग्रज

455
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील मौजे डिग्रज गाव पाण्याच्या विळख्यात आहे. पाऊस थांबून चार दिवस झाले तरी पूर्णपणे ओसरलेले नाही. गावकरी पुरातून जीव वाचवून सुरक्षित स्थळी पोहचले मात्र आता घराकडे जाण्यासाठी पाण्याची पातळी कमी होण्याची वाट पाहतायत.
माणसांना आता अनेक स्तरातून मदत मिळतेय मात्र जनावरांचे वैरण न मिळाल्याने खूप हाल होत आहेत. विस्कळीत जीवन पूर्ववत होताना गावकऱयांना भयंकर रोगराईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य मदत मिळण्याची गावकरी अपेक्षा करत आहेत.