Home > News Update > धक्कादायक – कोरोनाचा शिरकाव थेट राष्ट्रपती भवनात

धक्कादायक – कोरोनाचा शिरकाव थेट राष्ट्रपती भवनात

धक्कादायक – कोरोनाचा शिरकाव थेट राष्ट्रपती भवनात
X

संपूर्ण देशभर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना आता कोरोनाने राष्ट्रपती भवनातही शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती भवनातील १२५ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कोरोनाची लागण झालेली एक महिला असून ती राष्ट्रपती भवनातील एका सफाई कर्मचाऱ्याची नातेवाईक असल्याचे समजते आहे. ही महिला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होती, अशीही माहिती मिळत आहे.

हे ही वाचा..

Updated : 21 April 2020 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top