Home > News Update > गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना धमकी देणारा गजाआड

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना धमकी देणारा गजाआड

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना धमकी देणारा गजाआड
X

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना फेसबुकवरुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सूरज वडगावकर या तरुणाला अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर त्यांच्या समर्थकांनी अनामुष मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातले एका तरुणाने केला आहे.

त्यानंतर यावरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर या वादाचे तीव्र पडसागद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मारहाण झालेल्या तरुणाच्या समर्थनात अमरावती जिल्ह्याती बडनेरा इथं राहणाऱ्या सूरज वडगावकर या तरुणाने फेसबुकवरुन आव्हाड यांना मारण्याची धमकी देणारी भाषा असलेली पोस्ट टाकली होती.

या पोस्टवरुन सोशल मीडियावर वादंग सुरु असताना ऑनलाईन तक्रारीची दखल घेत अमरावती पोलिसांनी कलम ५०६ ब अन्वये सुरज वडगावकर या तरुणाला अटक केली आहे

Updated : 11 April 2020 1:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top