उद्धव ठाकरेंचा मुक्काम ‘मातोश्री’वरून ‘वर्षा’वर; देवेंद्र फडणवीसांना मिळाला ‘सागर’

courtesy- Social media

राज्याचे मुख्यमंत्री,(CM) मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना शासकीय निवासस्थानाचे वितरण करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून त्याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला देण्यात आला आहे.

काल विधानसभेच्या अधिवेशनात ‘मै समुंदर हुँ’ असं म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सागर बंगला देण्यात आला आहे. पाच वर्षांत फडणवीस यांचा प्रवास ‘वर्षा’ ते ‘सागर’ असा झाल आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ‘रॉयल स्टोन’ बंगला मिळाला आहे.

हे ही वाचा…

Big News : पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊत यांचे मोठे विधान

शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्‍त व चिंतामुक्त करणार- भगतसिंह कोश्यारी

फडणवीस केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री झाले- अनंत हेगडे

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे हा बंगला होता. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री असताना काही काळ हा बंगला वापरला होता. त्यामुळे हाच बंगला मिळावा असा पंकजा यांचा आग्रह होचा. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे याच ‘रॉयल स्टोन’मध्ये वास्तव्यास असताना मुख्यमंत्री झाले होते.

छगन भुजबळ यांना ‘रामटेक’ हा बंगला देण्यात आला आहे. हे एकेकाळचं मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवास्स्थान होतं. शरद पवार हे ‘रामटेक’वर वास्तव्य करणारे शेवटचे मुख्यमंत्री होते. आघाडीच्या काळात मंत्री असताना भुजबळ ‘रामटेक’ बंगल्यावर राहात होते. यासोबत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंनीही या बंगल्यात वास्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ हा बंगला देण्यात आला आहे.