Home > News Update > ३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे

३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे

३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे
X

अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत शिष्यवृत्त्या वितरित केल्या जातील असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिलं. आमदार गिरिष व्यास यांनी समाजकल्याण विभागातंर्गत येणाऱ्या शिष्यवृत्त्यांबाबत प्रश्नांची विचारणा केली. त्यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित असल्याबाबत गिरिष व्यास यांनी प्रश्न उपस्थित केला. नोंदणीकृत झालेल्या अनुसूचित जातीच्या ४ लाख ६० हजार ७६० अर्जांपैकी ३ लाख ८९ हजार ४३९ अर्ज पात्र ठरले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या वितरीत करण्यात आल्या असल्याची माहिती विश्वजित कदम यांनी सभागृहात दिली.

शिष्यवृत्ती विलंब प्रकरणावर शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार प्रवीण पोटे, तसेच आमदार रणजित पाटील यांनी उपप्रश्न विचारले. त्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सविस्तर उत्तरे दिली. ज्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांना विलंब झालाय अशा महाडीबीटी प्रणालीवर पात्र ठरलेल्या सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत शिष्यवृत्त्या वितरित केल्या जातील. शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकार घेईल असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.

केंद्राच्या पर्सनल फंड मॅनेजमेंटमुळे शिष्यवृत्तीसाठी विलंब होतो अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच या शिष्यवृत्ती अभावी एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीसुध्दा धनंजय मुंडे यांनी दिली.

Updated : 2 March 2020 10:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top