Home > News Update > भारत आणि चीनच्या वादात मध्यस्थाची गरज नाही- रशिया

भारत आणि चीनच्या वादात मध्यस्थाची गरज नाही- रशिया

भारत आणि चीनच्या वादात मध्यस्थाची गरज नाही- रशिया
X

गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या संघर्षानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर रशिया भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक महत्त्वाची बैठक झाली आहे.

या बैठकीमध्ये भारतातर्फे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे सहभागी झाले होते. या बैठकीनंतर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि चीन हे दोन्ही देश त्यांच्यातले वाद सोडण्यात सक्षम आहेत आणि ते शांतपणे या वादावर तोडगा काढतील असे म्हटले आहे.

त्याचप्रमाणे या दोन्ही देशांना कोणीही बाहेरून मदत करण्याची गरज नाही. हा उभयतांमधील वाद असल्याने तो शांततेने सोडवला जाऊ शकतो, असेही रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलेले आहे. या बैठकीमध्ये दोन देशांमधील वादावर चर्चा केली गेली नसली तरी भारताने चीनला फटकारण्याची संधी सोडली नाही.

हे ही वाचा...

चीनी हॅकर्सच्या ‘या’ ईमेलपासून सावधान! चीनी ड्रगन करतोय सायबर हल्ले

चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे का?

Samaana Editorial: चीनी गुंतणुकीबाबत राष्ट्रीय धोरण ठरवा - शिवसेना

आपल्या कृतींनी सहकारी देशांचे हित जपलं जाते आहे का, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन होत नाहीये ना याची खबरदारी प्रत्येक देशाने घेतली पाहिजे असं जयशंकर यांनी म्हटलंय.

दरम्यान भारत आणि चीनमधील तणावाचे सावट या बैठकीवरही दिसले. बैठकीनंतर कोणत्याही प्रकारचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेले नाही.

Updated : 24 Jun 2020 3:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top