पंकजा मुंडे आणि भाजपच्या वादात आम्ही नाक खुपसण्याची गरज नाही – अजित पवार

पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पिंपरी चिंचवडमधील विकासकामं होण्यासाठी आमच्या महानगर पालिकेतील नगरसेवकांची काय भुमिका असावी यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. शहराच्या विकासाकामात कोणत्याही प्रकारचं राजकारण मध्ये येणार नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केली जातील. जो कोणी पालकमंत्री होईल त्यांना विश्वासात घेऊन कामं करू अशी आशा अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

“आत्ता झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचं असुन नागपुरच्या अधिवेशनात कोणी प्रश्न विचारल्यास उत्तरं देण्यासाठी हा विस्तार झालेला आहे, या महिना अखेर पर्यंत तीनही पक्ष मिळून मुख्य विस्तार करतील. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील महत्वाचा निर्णय घेणं हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर अपेक्षित आहे.” असं अजित पवार यांनी खातेवाटपाविषयी म्हटलं आहे.

नागरिकता सुधारणा विधेयक (CAB) आणि (NCR) या मुद्द्यांवर पक्षातील वरिष्ठ भूमिका घेतील, पण जो हिंसाचार होतोय तो थांबणं गरजेचे आहे. देशपातळीवर काम करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी सामोपचाराने मार्ग काढला पाहीजे. सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी मिळुन या विधेयकावरुन जो काही भडका उडालेला आहे तो का उडाला आहे? त्यांच्या काय समस्या आहेत? हे समजुन घेतलं पाहीजे आणि मार्ग काढला पाहिजे.

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादावर “भारतीय जनता पक्षाचे जे राही अंतर्गत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी भाजप पक्ष आणि पक्षातील नेते खंबीर आहेत. त्यात आम्ही बाहेरील पक्षातील नेत्यांनी नाक खुपसण्याची गरज नाही. पंकजा मुंडे यांनी आपली भुमिका प्रांताध्यक्षांपुढे मांडली आहे. यावर त्यांचे केंद्रीय नेते निर्णय घेतील. आम्ही त्यावर काहीच वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.