Home > News Update > मी १०१ टक्के 'हाफ चड्डीवाला' – नितीन गडकरी

मी १०१ टक्के 'हाफ चड्डीवाला' – नितीन गडकरी

मी १०१ टक्के हाफ चड्डीवाला – नितीन गडकरी
X

'मी १०१ टक्के 'हाफ चड्डीवाला' आहे; पण कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही', मुस्लिमांना काँग्रेसनं(Congress) कायम व्होट मशीन मानलं असं म्हणत नितीन नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांनी आज कॉंग्रेस वर जोरदार टीका केली. नागपूर येथे आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी या मोर्चाला मार्गदर्शन करताना त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

यावेळी गडकरी यांनी ‘महात्मा गांधी यांनी त्या नागरिकांना आश्वासन दिले होते, तुम्हाला ज्या दिवशी असुरक्षित असल्याचे वाटेल, तेव्हा तुम्ही चिंता करू नका, भारत तुम्हाला आधार देईल, असं महात्मा गांधी यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभाई पटेल यांनी सांगितले होतं’ असा दावा करत गडकरी यांनी याच निर्वासितांना ७० वर्षांनंतर आमच्या सरकारने भारताचे नागरिकत्व प्रदान केले. मग आम्ही काय चुकीचे केले? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

Updated : 22 Dec 2019 9:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top