घरात लेकरं बाळ आहेत, आम्हाला या वादळा बद्दल कुणीच सांगीतलेलं नाही

मुंबईमध्ये काही मिनिटांच्या अंतरावर निसर्ग वादळ येऊन धडकण्याची शक्यता असतानाच मानखुर्द मध्ये असलेल्या महाराष्ट्र नगर, मंडला गाव, चिता कॅम्प, साठे नगर, परिसरातील अनेक लोक पालात आणि कच्च्या झोपड्यात राहतात. या लोकांना प्रशासनानं कोणतीही माहिती दिली नसल्यामुळं या लोकांना या वादळाबाबत कुठलीही माहिती नव्हती.

बाहेर मोठ्या प्रमाणात वारा वाहू लागल्यानंतर इथल्या लोकांना वादळ आल्याचं समजलं. तो पर्यंत आपल्या लहान मुलाबाळांसह पालातच होते.

मुंबई चे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखुर्द परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या शेकडो लोकांची प्रशासनाने खबरदारी घेतली नसल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.