Nisarga Cyclone: पुढील 3 ते 4 तास निसर्ग चक्रीवादळ ‘या’ शहरांमध्ये

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ आता महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सहित आसपास च्या भागामध्ये येऊन धडकलं आहे. स्कायमेट ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 4-5 तास तुफान वाऱ्यासह या भागात अति मुसळधार पाऊस पडू शकतो. समुद्रामध्ये मोठ्या लाटा निर्माण झाल्या आहेत.

खबरदारी म्हणून शासनाने समुद्र किनारी असणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. रायगड, रत्नागिरी, सारख्या कोकण किनारी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये कलम 144 कर्फ्यू लागू करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणची वीज बंद करण्यात आली आहे.
मुंबईत प्रशासनाने रेड अलर्ट देऊन किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. मुंबई चे पालिका आयुक्त इक्बाल चहल आणि अग्निशमन दलाचे प्रमुखांनी दादर आणि गिरगाव चौपाटीची पहाणी केली.

विशेष म्हणजे खबरदारीचा उपाय म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक बंद करण्यात आला आहे. वाहनं पुन्हा माघारी फिरत आहेत.

‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकलं, महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये 43 NDRF टीम तैनात

खबरदारीचा उपाय म्हणून देशात साधारण 43 NDRF ची पथक तैनात करण्यात आली आहेत. यातील 21 महाराष्ट्रात तैनात करण्यात आली आहेत. तर 16 गुजरात मध्ये तैनात करण्यात आली आहेत. 1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या संदर्भात NDRF चे अधिकारी एस. एन. प्रधान यांनी माध्यमांना या संदर्भात माहिती दिली.