Home > News Update > NirbhayaCase : अखेर एका आईचा शर्थीचा लढा सफल ; निर्भयाचे आरोपी फासावर !!

NirbhayaCase : अखेर एका आईचा शर्थीचा लढा सफल ; निर्भयाचे आरोपी फासावर !!

The four convicts in the gang-rape and murder of a 23-year-old physiotherapy student have been hanged at Delhi's Tihar Jail today. After three of the four death-row convicts in the Nirbhaya gang-rape and murder case moved the Delhi high court Thursday evening challenging the trial court order declining to stay their execution scheduled for early Friday morning, Supreme Court today also rejected the petition of death row convicts and refused to defer the execution.

NirbhayaCase : अखेर एका आईचा शर्थीचा लढा सफल ; निर्भयाचे आरोपी फासावर !!
X

९ फेब्रुवारी, २०१३ रोजी तिहार कारागृहात अफझल गुरूला फाशी देण्यात आली होती. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा फाशीची अंमलबजावणी झालीय निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणात !!! चौघांना एकाच वेळी फाशी देण्याची तिहारमधली ही पहिलीच घटना आहे.

१६ डिसेंबर, २०१२ रोजी घडलेल्या निर्भया बलात्कार व हत्याकांडाने अवघा देश हादरला होता. अत्यंत क्रूर पद्धतीची ही घटना होती. न्यायालयाने या घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ घटना म्हटलं होतं. सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात फाशीची शिक्षा निश्चित होऊनही आरोपी पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश सिंग, अक्षय कुमार सिंग यांची फाशी वकीलांमार्फत विविध कायदेशीर क्लृप्त्या अवलंबल्यामुळे वाॅरंट निघाल्यानंतरही वारंवार टळत होती. पीडीतेची आई या साऱ्या घटनांनी व्यथित होती. प्रत्येक टप्प्यावर त्या माऊलीने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची पराकाष्ठा केली. अखेर एका आईने हा लढा जिंकला आणि आरोपी फासावर गेले.

तुरूंग नियमांप्रमाणे अधिकारी फाशीपूर्वी आरोपींना भेटले. कागदपत्रांची पूर्तता केली. त्यावेळी आरोपीचं सगळं अवसान गळून पडलं होतं. नियमाप्रमाणे आरोपींच्या कुटुंबियांना फाशीच्या ठिकाणापासून दूर ठेवण्यात आलं होतं. कोठडीतून फाशीच्या ठिकाणाजवळ पोहोचण्यापूर्वी आरोपींना चेहऱ्यावर बुरखे चढवण्यात आले. पवन जल्लाद मंगळवारपासूनच तिहारमध्ये होता. गेले दोन दिवस फाशीची तयारी सुरू होती. काल डमी फाशी देऊन सरावही करण्यात आला होता. आज पहाटेच फाशीची अंमलबजावणी झाली व गेली सात वर्षे सुरू असलेल्या बहुचर्चित प्रकरणाचा अध्याय संपुष्टात आला.

Nirbhaya Case Nirbhaya Gets Justice Four Convicts Hanged

Updated : 20 March 2020 12:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top