Home > News Update > मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची ‘धमक’ नाही तर आढावा बैठक कशासाठी? – निलेश राणे

मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची ‘धमक’ नाही तर आढावा बैठक कशासाठी? – निलेश राणे

मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची ‘धमक’ नाही तर आढावा बैठक कशासाठी? – निलेश राणे
X

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील २ दिवसांपासून कोकण दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्व कोकणवासियांचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे

कोकणवासियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र, सर्वांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्यात. मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची ‘धमक’ नसल्याचा खोचक टोला निलेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

जिल्हा नियोजन आढावा बैठकीत एकही निर्णय घेण्यात आला नाही. कोकणातील विकास कामांना महाविकासआघाडीने दिलेल्या स्थगितीवर निर्णय नाही, एक नवा पैसा कोकणासाठी जाहीर केला नाही. त्याचप्रमाणे साधी पत्रकार परिषद देखील मुख्यमंत्र्यांनी घेतली नसून त्यांच्या दौऱ्यामुळे अंगणेवाडीत भाविकांची गैरसोय झाली असल्याचा आरोपही निलेश राणेंनी केला आहे.

Updated : 19 Feb 2020 9:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top