Home > News Update > रत्नागिरी जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाउन…

रत्नागिरी जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाउन…

रत्नागिरी जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाउन…
X

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा १ ते ८ जुलैपर्यंत कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २८ जून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 कोरोनाचे रुग्ण रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८० असून, त्यापैकी ४३० जणांनी करोनावर मात केली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या शुन्यावर आणण्यासाठी व करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी शहरातील दापोलीतील दोन गावात करोना रुग्णांनाची कोणतीही हिस्ट्री नसल्याने जिल्ह्यात सामुहिक संसर्ग होण्याची शक्यता असून त्याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र, सावधानता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती पाहून लॉकडाउन शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १ जुलै ते ८ जुलै दरम्यान असा असेल लॉकडाउन :

१ मंगळवारी (३० जून) मध्यरात्रीपासून म्हणजेच एक जुलैपासून ही अंमलबजावणी केली जाणार आहे.

२ १ जुलै ते ८ जुलै असा कडक लॉकडाउन सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत राहणार आहे.

३ अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही

४ जिल्ह्यात प्रवेशबंदी करता येणार नसून जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

५ या काळात दुकाने,चारचाकी वाहने दुचाकी वाहने, रिक्षा आदींना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

६ या काळात खासगी कार्यालयदेखील पूर्णपणे बंद राहणार आहेत.

७ संध्याकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्णपणे कर्फ्यू राहणार आहे.

८ यावेळी नाईट कर्फ्यू ची अमंलबजावणी अतिशय कडक होईल

९ प्रतिबंधित क्षेत्रातील नियम आणखी कडक राहतील.

रत्नागिरी जिल्ह्यात १ जुलै ते ८ जुलै दरम्यान काय सूरू राहणार :

१. शासकीय कार्यालयात १० टक्के उपस्थिती राहील. स्वच्छता कर्मचारी, बँका, पोस्ट, फोन, इंटरनेट, अन्नधान्य, दूध, भाजीपाला, पेट्रोल पंप, प्रसारमाध्यमे, पशुवैद्यकीय दवाखाने, शेतीविषयक कामे, कृषीमाल, शीतगृहे, पशुखाद्य दुकाने, बंदरे, वैद्यकीय दुकाने, दवाखाने, रुग्णवाहिका, चष्मा दुकाने तसेस आरोग्याशी संबंधित व्यवहार सुरू राहतील.

२ सरकारी कार्यालयात फक्त १० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

३ बँका व पोस्ट सेवा सुरू राहणार आहेत. तसेच कृषी संबंधीचे दुकाने सुरू राहणार आहेत.

४ फक्त वैद्यकीय कारणांसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.

५ मांस, मासेविक्रीची दुकाने बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सुरू राहतील.

६ अत्यावश्यक वस्तू घरपोच देण्याबाबत चर्चा सुरू आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात येणार असून जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद राहणार आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रत्येकावर आलेले संकट आहे, असे समजून काम करायला हवे. शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच गरजेच्या वेळी मदत म्हणून जिल्ह्यात कॉल सेंटर सुरू करायचा प्रयत्न आहे. असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हटले आहेत.

Updated : 29 Jun 2020 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top