बालाकोट मध्ये २५०-३०० अतिरेकी मारले गेले असण्याची शक्यता – अभिनंदनच्या वडीलांचं मत

Courtesy : Social Media
बालाकोटच्या हवाई हल्ल्यात २५०-३०० अतिरेकी मारले गेले असावेत अशी शक्यता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या वडिलांनी बोलून दाखवली आहे. आयआयटी मद्रास च्या संरक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना निवृत्त एअर मार्शल सिम्हाकुट्टी वर्धमान यांनी सांगीतलं की, टार्गेट वर असलेले जास्तीत जास्त अतिरेकी कँप मध्ये असताना भारताचा हवाई हल्ला झाला. स्पाइस २००० वापरल्यामुळे इमारतीला कमीत कमी नुकसान झालं, पण टार्गेट मात्र हेरण्यात यश आलं आहे.
लढाऊ विमानांना भारतीय हद्दीत १० किलोमीटर वर असताना रडारतर्फे परतीच्या सूचना दिल्या जातात, जर आठ किलोमीटर पर्यंत आपली विमानं गेली तर पायलट ला अनेक चौकशांना सामोरं जावं लागतं, अशा परिस्थितीत आपण पाकिस्तान हद्दीत जाऊन आतिरेकी तळावर हल्ला करणं ही मोठी गोष्ट आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, असं ही वर्धमान यांनी सांगीतलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here