Home > News Update > #कोरोनाशी_लढा- आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

#कोरोनाशी_लढा- आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

#कोरोनाशी_लढा- आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना
X

कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टर तसंच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केंद्रीय आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचा क्वारंटाईन कालावधी कमी करुन १४ वरुन ७ दिवस करण्यात आला होता. पण आता त्या त्या हॉस्पिटलमधील प्रमुखांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रकृती नुसार आणि लक्षणांनुसार ७ दिवसांपेक्षा जास्त क्वारंटाईन करण्याची गरज आहे का याचा निर्णय घ्यायचा आहे.

अशा आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली पण त्यांना लक्षणं नसतील तर कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठीचे नियम त्यांना पाळावे लागणार आहेत. जर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहून कामावर परत येता येणार आहे.

हे ही वाचा..

#कोरोनाशी_लढा- गृहनिर्माण सोसायट्यांना सहकार मंत्र्यांचा इशारा

कोणत्याही समाजावरील अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही: अनिल देशमुख

परप्रांतीय कामगारांची वापसी सुरु!

ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करणं खरंच शक्य आहे का?

सौम्य लक्षणं असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी होम क्वारंटाईनमध्ये रहावे आणि त्यांना ऑक्सिजनची गरज असल्यास कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक हॉस्पिटलने संसर्ग नियंत्रण समिती स्थापन करुन हॉस्पिटलमध्ये संसर्ग रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचे पालन होते आहे की नाही याची खातरजमा करत राहण्याचेही सांगण्यात आले आहे.

Updated : 19 Jun 2020 2:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top