Home > News Update > तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर, नेटकऱ्यांनी महापौरांना शिकवले शहाणपण

तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर, नेटकऱ्यांनी महापौरांना शिकवले शहाणपण

तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर, नेटकऱ्यांनी महापौरांना शिकवले शहाणपण
X

नागपूरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यात निर्माण झालेल्या वादात अनेक आरोप आणि प्रत्यारोप झाले. पण तुकाराम मुंढे यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरल्याने सत्ताधाऱ्यांची पंचाईत झालेली आहे. एवढेच नाही तर तुकाराम मुंढे यांना आता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या फेसबुक पेजवर आलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथं देत आहोत.

सुभाष गीते

नदी नाले ( नागपूर येथील) साफ करण्यासाठी मागल्या वर्षी आलेला खर्च १.०२ कोटी.यावर्षी आलेला खर्च ४२ लाख यावरून सिद्ध होते की भ्रष्टाचार कोणी केला असेल आरोप करू नका जुन्या फाईल काढणे भाग पडेल

मी मुंडे साहेब यांच्या सोबत आहे.

हे ही वाचा..

तुकाराम मुंढेवर 20 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महापौर संदीप जोशी यांची पोलिसात तक्रार

VIDEO: माझी व्यक्तिगत प्रतिमाहनन केलं जात आहे: तुकाराम मुंडे

…तर कोरोनाचा उद्रेक अटळ – तुकाराम मुंढे

श्याम पोखरकर

महापौर साहेब, सनदी अधिकाऱ्यांचा आदर करा. महानगरपालिकेचा कारभार आपल्याला ह्या अधिकाऱ्यांच्या मदतीनेच चांगल्या प्रकारे करता येईल एवढे मात्र नक्की. कारण त्यांना फक्त पाच वर्षासाठी खुर्ची भेटलेली नाही.सुज्ञास जास्त सांगण्याची गरज नसावी. नाहीतर पुढील निवडणुकीत जनता आपल्याला आपली जागा दाखवायला मागेपुढे पहाणार नाही हे पण नक्की.

दिनेश ब्राह्मणे

प्रशासनात आपल्यातील प्रामाणिकपणा व कर्तबगारीच्या जोरावर नावलौकिक मिळविणारे जे मोजकेच अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये सन्मा.मुंडे साहेब यांच नाव खूपच वरती आहे.

आणि याच प्रामाणिकपणाचं बक्षीस त्यांच्या वारंवार बदल्या करून दिल जात हे देखील सत्य आहे.

आता खरी जबाबदारी नागपूरच्या सामान्य जनतेची आहे, त्यांनीच ठरवायचं आहे की प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं की स्वार्थी नेत्यांच्यापुढे हात जोडून उभं राहायचं.

आदरणीय मुंडे साहेब आजची तुमची पत्रकार परिषद पाहून तुमच्या बद्दलचा आदर आणखी वाढला आहे. तुम्ही तुमच्या लोकाभिमुख भूमिकेवर ठाम रहा, नागपूरची सामान्य जनता नक्कीच तुमच्या सोबत राहील.

स्वप्नील संतोष

मुंढे साहेब IAS आहेत त्यांना नगरसेवका पेक्ष्या जास्त जनतेची काळजी आहे यात तिळमात्र कुणी शंका करू नये. शहराच्या प्रथम नागरिकांनी केलेला FIR परत न घेता आरोप सिद्ध करून दाखवावा?

विकास सोनवणे

जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे असं एक IAS तुकाराम मुंडे यांना कोण सांगत आहे..? ज्यांनी जनतेला लुटलं, कोनाची तरी लाचारी करून, कोणाला तरी गाडून, वर आलेले नगरसेवक व महापौर.. तुकाराम मुंडेंना अक्खा महाराष्ट ओळखतो ते त्यांच्या कामामुळे... आणि तुम्हाला कोण ओळखत? खरंच तुम्हाला जनतेची काळजी असेल तर एकदा तुमची व तुमच्या सर्व नगरसेवकांची प्रॉपर्टी जनतेला दाखवा तुकाराम मुंडे साहेब त्यांची दाखवतील. मग जनते बद्दल तुमचं प्रेम कळेल...

भास्कर बागवे

पुर्ण महाराष्ट्रभर अशा १०० मुंडेंची जर फौज झाली तर या सर्व चोर राजकार्ण्याना पळतां भुई थोडी संपणार नाही. चंद्रशेखर नंतर हा एकच मानुस आहे जो सर्व चोरांना पुरून ऊरेल.

Updated : 25 Jun 2020 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top