Home > News Update > छत्रपतींची तुलना मोदींशी केली तेव्हा संभाजी भिडे गप्प का? – सुप्रिया सुळे

छत्रपतींची तुलना मोदींशी केली तेव्हा संभाजी भिडे गप्प का? – सुप्रिया सुळे

छत्रपतींची तुलना मोदींशी केली तेव्हा संभाजी भिडे गप्प का? – सुप्रिया सुळे
X

सांगली जिल्ह्यामध्ये आज संभाजी भिडे (sambhaji bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. शिनसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत या आशयाच्या वक्तव्यास विरोध म्हणुन हा बंद पुकारण्यात आला आहे.

बंदमुळे सांगली जिल्ह्यातील वातावरण तापले असून सुरक्षा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. “संभाजी भिडे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याशी केली तेव्हा का गप्प राहिले?” अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

“हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्यांच्यासाठी 'बंद'. हे जरा चुकीचे वाटतं... यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर असं करणं हे योग्य वाटत नाही. संजय राऊत यांनी कालच त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवं.” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

Updated : 17 Jan 2020 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top