आता कोणत्याही गडावरून कसलंच राजकारण नाही – धनंजय मुंडे

“आम्हाला कोणालाही वाटले नव्हते. मी मंत्री होईल माञ आता मंत्री झालोय. त्यामुळे सर्वाधिक विकास बीड जिल्ह्याचा करायचा आहे. मी आज नारायणगडावर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद घेण्यापूर्वी रात्री पालकमंत्री पदाची घोषणादेखील झाली. आता कोणत्याही गडावरून कसलंच राजकारण नाही. तर विकास होईल.” असं वक्तव्य समाज कल्याण मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

“आम्ही जास्त होरपळलेले आहोत. संदीप क्षीरसागर यांचा काळ कमी होता. मात्र माझा काळ जास्त होता. मी उतणार नाही मातणार नाही. घेतला वसा खाली कधी टाकणार नाही.” असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. पाहा व्हिडीओ…