Home > News Update > सहकारी बॅंकांचं खासगीकरण पर्याय नाही, शरद पवारांचे मोदींना चार पानी पत्र

सहकारी बॅंकांचं खासगीकरण पर्याय नाही, शरद पवारांचे मोदींना चार पानी पत्र

सहकारी बॅंकांचं खासगीकरण पर्याय नाही, शरद पवारांचे मोदींना चार पानी पत्र
X

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशातील सहकारी बॅंकांच्या स्थितीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांचे लक्ष वेधण्यासाठी 4 पानी पत्र लिहिलं आहे. या पत्रात पवारांनी अलिकडे केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अस्पृश्यतेचा आहे. निव्वळ व्यावसायिकता व नफा हाच सहकारी बँकांकडे बघण्याचा सध्याचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन आहे. मात्र, सहकारी बँकांचे स्थान व उपयुक्तता पाहता तो योग्य नाही, 'सहकारी बँकांचे अस्तित्व व ओळख टिकायलाच हवी, अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

पवारांनी मांडली आर्थिक आकडेवारी...

शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बॅंकेबरोबरच खासगी बॅंका आणि सरकारी बॅंकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची माहिती दिली आहे. त्यानुसार, देशात आजपर्यंत सर्वाधिक घोटाळे सरकारी बँकांमध्येच झाल्याचं पवारांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. त्यातून झालेले नुकसान ६५ हजार कोटींच्या घरात आहे. त्यानंतर, खासगी, विदेशी आणि वित्तसंस्थांचा क्रमांक आहे. सहकारी बँका या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहेत. त्यामुळं सहकारी बँकांमध्येच घोटाळे होतात असं गृहित धरणं चुकीचं असल्याचं शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हे ही वाचा...

“अपरिपक्व नंबर – २” भाजपचा रोख कुणाकडे?

“कोर्टाच्या अवमानाची भीती दाखवून आवाज दाबता येणार नाही”

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार

जैविक आपत्तीला कसं तोंड द्यावं?

बॅकांना आर्थिक शिस्त हवी...

बँकांना आर्थिक शिस्त लावली पाहिजे यात दुमत नाही. असं पवार म्हणतात... माधवपुरा सहकारी बँकेनंतर PMC बॅंक घोटाळा समोर आल्यानंतर सरकारने सहकारी बँकांवर नियंत्रण आणण्यासाठी विधेयक आणले. या विधेयकावर वेळे अभावी चर्चा न झाल्यानं सरकारनं वटहुकूम काढला. मात्र, सर्वच सहकारी बँकांचे खासगीकरण करून घोटाळे, अनियमितता व फसवणूक थांबेल असा समज करुन घेणं चुकीचं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

सहकारी बॅकांचं खासगीकरण करुन प्रश्न सुटतील का?

सहकारी बॅकांचं खासगीकरण करुन प्रश्न सुटतील का? असा सवाल पवारांनी आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. त्याऐवजी जनतेमध्ये अर्थविषयक जागृती करणं गरजेचं असल्याचं पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

सहकारी बँका या प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या हिंमतीवर टिकून आहे. त्यामुळं आपण स्वत: या प्रश्नात लक्ष घालून १०० हून अधिक वर्षांचा वारसा असलेल्या या क्षेत्राला न्याय द्यावा, अशी विनंतीही पवार यांनी केली आहे.

Updated : 19 Aug 2020 6:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top