Home > News Update > शरद पवार इंदू मिलच्या जागेची आज पाहणी करणार

शरद पवार इंदू मिलच्या जागेची आज पाहणी करणार

शरद पवार इंदू मिलच्या जागेची आज पाहणी करणार
X

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून त्यामध्ये दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा देखील समावेश आहे. नुकताच या स्मारकाची उंची १०० फुटाने वाढवुन ११०० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आलाय.

इंदू मिलमध्ये (Indu Mill) होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Memorial) जागेची आणि आराखडय़ाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज दुपारी ०३:३० वाजता करणार आहेत. आज पाहणीसाठी पवारंसोबत अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडय़ाची पाहणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पुढील दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते.

Updated : 20 Jan 2020 3:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top