सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास : शरद पवार

32

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र तसंच मुंबई पोलिसांवर आपल्याला १०० टक्के विश्वास आहे. सुशांत राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण तापलेले असताना शरद पवार यांनी यावर आतापर्यंत एकदाही प्रतिक्रिया दिली नव्हती.

हे ही वाचा…

“15 ऑगस्टपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करा अन्यथा”

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण!

उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल: भाजप नेत्यांचं ट्विट

पण बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे, असे व्हायला नको होते, पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटते असे शरद पवार म्हटले आहेत.

“एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं.  माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडिया त्याची नोंदही घेत नाही,” अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान संजय राऊत यांनी या बैठकीनंतर सर्व विषयांवर चर्चा झाली असे सांगत मीडियाशी बोलणे टाळले.

Comments