भाजप नेत्यांच्या दाव्याचे ‘तुकडे तुकडे’

भाजप (BJP)  नेत्यांनी उघडउघड टीका केलेल्या तुकडे तुकडे गँगची केंद्रीय गृहमंत्रालयाला माहितीच नसल्याची धक्कादायक बाब उघड झालीये. माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले (sanket gokhale)  यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे तुकडे गँगबद्दल माहिती मागितली होती.

पण केंद्रीय केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नसल्याचं उत्तर सरकारने दिलंय. सरकारचं हे उत्तर माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी सोमवारी ट्विटकवर टाकले. पण यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची चांगलीच पंचाईत झालीये.

हे ही वाचा…

मुंबई महापालिका भरणार नव्याने ५२५५ पदे

स्मारकांबद्दल तरुणांना काय वाटतं?

शरद पवार इंदू मिलच्या जागेची आज पाहणी करणार

नांदेड: शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी शिक्षक फरार

अमित शाहांसह भाजपचे अनेक नेते ‘तुकडे तुकडे गँग’ देशात विभाजन घडवण्याचा डाव आखत असल्याची जाहीर टीका करतात. पण प्रत्यक्षात ही गँग कोण याचीच माहिती सरकारकडे नाहीये. जेएनयूमध्ये ३ वर्षांपूर्वी सरकारविरोधी आंदोलनानंतर भाजपाकडून ‘तुकडे तुकडे गँग’चा उल्लेख होऊ लागला होता. याचसंदर्भात साकेत गोखले यांनी आरटीआयअंतर्गत माहिती मागवली होती. पण त्यात सरकारनं अशा कोणत्याही गँगची माहिती नसल्याचं सांगितलंय.