पुढील वर्षी कोरोना ची लस येणार: प्रा. आशिष झा

Courtesy : Social Media

कोरोना (corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज हार्वर्ड यूनीवर्सिटी (Harvard University) चे प्राध्यापक प्रा. आशिष झा (ashish jha)आणि स्वीडन चे प्राध्यापक जोहान गिसेक यांच्याशी चर्चा केली. ते हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत. या विद्यापीठामध्ये सध्या कोरोना च्या लसी संदर्भात संशोधन केलं जात आहे.

यावेळी प्राध्यापक आशिष झा यांनी आत्तापर्यंत तीन लसींवर काम केलं गेलं आहे. यामध्ये बऱ्यापैकी परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यातील एक लस पुढच्या वर्षी येईल अशी माहिती आशिष झा यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलताना सांगितली.