नाशिक पोलिसांचं आजपासून ड्रोन कमेराद्वारे पेट्रोलिंग : विश्वास नांगरे

देशात लागू केलेल्या संचारबंदीनंतर आता नाशिक पोलिसांनी 295 गुन्हे दाखल केले आहे . वारंवार सांगूनही काही नागरिक काम नसतानाही बाहेर पडत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांनी 188 प्रमाणे कारवाई केली आहे.. पोलिसांना कारवाईसाठी मदत व्हावी या दृष्टिकोनातून शहरात आजपासून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू करन्यात आलं आहे. हे पेट्रोलिंग सुरुवातीला गोदावरी घाटावर करण्यात आले. यावेळी जे नागरिक विना कामाचे रस्त्यावर होते. अशा लोकांना दंडुक्याचा प्रसाद देऊन त्यांच्यावर 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली.

8 ड्रोन कॅमेऱ्याची शहरावर नजर

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरात एकूण 86 नाका बंदी पॉईंट्स तयार करण्यात आले असून त्यासाठी 65 बिट मार्शल आणि पोलिसांच्या 16 चार चाकी कार्यान्वित करण्यात आल्या आहे. शहरात सध्या 8 ड्रोन कॅमेरे गर्दीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहे. तर गरजेनुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनला 1 कॅमेरा देण्याचा विचार असल्याचं पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.