Home > News Update > ‘मोदी द्वेषाधारीत राजकारणाची चप्पल बाहेर काढायला विसरले’

‘मोदी द्वेषाधारीत राजकारणाची चप्पल बाहेर काढायला विसरले’

‘मोदी द्वेषाधारीत राजकारणाची चप्पल बाहेर काढायला विसरले’
X

स्वामी विवेकानंद जयंतीला मोदीजींना बेलूर येथील रामकृष्ण मठात भाषणाला बोलावले होते. बेलूर मठात जातांना नेहमीप्रमाणे मोदीजी आपली द्वेषाधारीत राजकारणाची चप्पल बाहेर काढायला विसरले. तिथे गेल्यावर मोदीजींनी CAA च्या प्रचाराचे भाषण दिले. पण रामकृष्ण मठात असणारे लोक हे हिंदू धर्म कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा त्यांच्या आय टी सेल कडून शिकत नसून त्यांनी तो स्वामी विवेकानंदांच्या विचारातून आत्मसात केला आहे. याचा बहुधा त्यांना विसर पडला असावा.

आपल्या जादुई व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन संन्यासी स्वामी विवेकानंदांची शिकवण विसरून "मोदी, मोदी" ओरडायला लागतील. असे त्यांच्या इमेज बिल्ड करणाऱ्या कंपनीने त्यांना सांगितले असावं पण तसे काही झाले नाही, झाले उलटंच.

स्वामी सुविरानंद जे रामकृष्ण मिशन व मठ दोन्हींचेही जनरल सेक्रेटरी आहेत. त्यांनी मोदीजींच्या या भाषणावर वर आक्षेप घेत सांगितले. की...

"आम्ही एक सर्व समावेशक संस्था आहोत, आमच्यातील संन्यासी हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व समाजघटकांतून आलेले आहेत. इथे आम्ही सख्ख्या भावंडांप्रमाणे राहतो. "सत्ता प्राप्तीसाठी धर्माचा वापर करणाऱ्या मूठभर हिंदुत्ववाद्यांपेक्षा सत्तेच्या मागे न लागणारा एक मोठा सहिष्णु हिंदू समाज या देशात आहे. रामकृष्ण मिशन, गुरुदेव सेवाश्रम सारख्या असंख्य संस्था, संघटनांमधून तो या देशाला एकत्र धरून आहे.

हिंदुत्ववाद्यांचे पुरोगाम्यानंतर नंबर दोनचे शत्रू कोणी असतील तर ते हे सहिष्णु हिंदू. JNU त पुरोगाम्यांची डोकी फोडून झाल्यावर आता बहुधा ते यांच्याकडे वळतील आणि हीच या कट्टर विचारांच्या पराभवाची सुरुवात असेल. दरम्यान, फेसबुक, व्हाट्सअप वर स्वतःला हिंदू धर्म रक्षक समजणारे लोक स्वामी विवेकानंदांचा हा सहिष्णू व सर्वसमावेशक हिंदू धर्म समजून घेण्याचे श्रम घेतील काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

Updated : 15 Jan 2020 8:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top