Home > News Update > मुंढेंचा दणका: 9 कर्मचाऱ्यांचे निलंबन

मुंढेंचा दणका: 9 कर्मचाऱ्यांचे निलंबन

मुंढेंचा दणका: 9 कर्मचाऱ्यांचे निलंबन
X

आपल्या कामाच्या खास शैलीने प्रशासन गतिमान ठेवणारे तुकाराम मुंढे सध्या नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी कार्यरत आहेत. कोरोना च्या काळात त्यांनी केलेल्या उपाययोजना आणि लोकप्रतिनिधी सुरु असलेल्या वादामुळे ते सध्या चर्चेत आहेत.

शुक्रवारी सायंकाळी त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी महापालिका क्षेत्रात अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी महानगरपालिकेची स्वच्छता आणि कोरोना मदत केंद्रांना भेट दिली.

नागपूर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच असलेला कोरोना नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असतो. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना वेळ ठरवून दिलेला असतो. मात्र,रात्रपाळीत असलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याचे निर्दशनास आले असता, मुंडे यांनी या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.

निलंबित कर्मचारी...

किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.

त्यानंतर मुंढे यांनी महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेची पाहणी केली. आणि हजेरी रजिस्टरची तपासणी केली. त्यामध्ये काही स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले असता, त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

या कर्मचाऱ्यांना केलं निलंबित…

स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक ५ चे राजेंद्र सोनटक्के, दिनेश करोसिया यांचा समावेश आहे.

Updated : 25 July 2020 5:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top