आज राहुल गांधी यांनी ‘भारत बचाओ रॅली’मध्ये भाजपचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधी यांनी झारखंडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना “नरेंद्र मोदी म्हणाले होते, मेक इन इंडिया, मात्र, सध्या तुम्ही कुठेही पाहिल्यास ‘रेप इन इंडिया’ दिसतं.’’ असं म्हणत देशातील अत्याचाराच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती.

हे ही वाचा
खासदार संजय काकडे तुझ्यात हिम्मत असेल तर घराबाहेर ये- धनराज गुट्टे
केंद्र सरकार करतंय दारूड्यासारखं काम; प्रकाश आंबेडकर यांचा हल्ला
नास्तिकांची मुस्कटदाबी !

यावर केंद्रीय मंत्री स्मृती इरानी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारतातील पुरूषांना काँग्रेसचे नेते तसंच लोकसभेचे सदस्य राहुल गांधी यांनी बलात्कार करा असा आदेश दिला आहे, आणि प्रत्येक महिलेला कलंकित करण्याचं पाप त्यांनी केलं असून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशा आशयाचं जोरदार आणि आक्रमक भाषण स्मृती इराणी यांनी लोकसभेत केलं होतं. त्यावर राहुल गांधी यांनी ‘मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच देशाची माफी मागावी, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

पाहा काय म्हणाले राहुल गांधी…