#CAB विरोधात मुस्लिम समाजाचा विधानभवनावर मोर्चा

125

देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मोठा विरोध केला जात आहे. सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज मुस्लिम बांधवांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध म्हणून विधानभवनावर मोर्चा काढला. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी या कायद्याला विरोध करत, या कायद्याचा निषेध नोंदवला. तसंच या कायद्याची अंमलबजावणी होऊ नये अशी मागणी देखील यावेळी मुस्लिम बांधवांनी केली.

दरम्यान फडणवीस सरकारने मुस्लिम समाजाला आघाडी सरकारने दिलेले पाच टक्केआरक्षण रद्द केले होते. हे पाच टक्के आरक्षण सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपण असल्याचं कारण देत देण्यात आले होते.
मात्र देवेंद्र फडणीस यांच्या सरकारने धर्मावरून आरक्षण देता येत नाही असं कारण देत मुस्लिम समाजाचा आरक्षण नाकारलं होतं.

आता राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महा विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे पुन्हा एकदा सरकारने हे आरक्षण द्यावे अशी मागणी या मोर्चाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी केली आहे.